"मुस्लिम वेलफेअर असोसिएशन नांदेडच्या युवक जिल्हाध्यक्षपदी मोहम्मद अरसलान यांची नियुक्ती"
नांदेड दि. ३ – मुस्लिम वेलफेअर असोसिएशन नांदेडच्या युवक जिल्हाध्यक्षपदी मोहम्मद अरसलान यांचा निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शफी उर रहमान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.
मोहम्मद अरसलान यांच्या कार्यकुशलतेचा व सामाजिक कार्यातील योगदानाचा विचार करून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुस्लिम समाजातील युवकांपर्यंत संघटनेचे कार्य पोहोचविणे, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक भान निर्माण करणे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
जिल्हाध्यक्ष शफी उर रहमान यांनी नियुक्तीपत्र प्रदान करताना सांगितले की, मुस्लिम वेलफेअर असोसिएशन युवकांच्या माध्यमातून समाजातील समस्यांकडे लक्ष वेधणार आहे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी सक्रिये भूमिका घेणार आहे.
या प्रसंगी फैसल सिद्दीकी, राहील अन्वर जाविद, मिर्झा फुरकान, शेख शफीक, शेख वाजिद हे उपस्थित होते.

Comments
Post a Comment