नांदेडमध्ये महिलेचा हुंड्यासाठी छळ, 'जील एजुकेशन कन्सल्टन्सी'चे मालक पतीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल*
नांदेड: येथील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा हुंड्यासाठी शारीरिक
आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहीन फातेमा सय्यद नईम यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. सय्यद नईम हे 'जील कन्सल्टन्सी पिर बुऱ्हाण नगर चे मालक आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहीन फातेमा यांचा विवाह 'जील कन्सल्टन्सी'चे मालक सय्यद नईम यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांपासून सय्यद नईम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माहीन यांना दोन लाख रुपये हुंडा म्हणून आणण्यासाठी तगादा लावला होता. या मागणीसाठी त्यांनी व त्यांच्या कुटुंबांनी माहीन यांना शिवीगाळ केली, मारहाण केली आणि उपाशी ठेवले. तसेच, त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी 'जील कन्सल्टन्सी'चे मालक सय्यद नईम (पती), जमीला बेगम (सास), सय्यद नदीम (देवर), समरीन बेगम (नणंद), सनाबेगम (नणंद), इमरान पाशा (नंदोई), सय्यद माजिद (नंदोई), सय्यद महेबुब (चाचा) आणि सय्यद पाशा (चाचा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. याप्रकरणी 19 मे 2025 रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत...

Comments
Post a Comment